जागतिक महिला दिनानिमित्त पणजी गोवा,येथे विविध क्षेत्रात  कार्यरत महिलांना सन्मानीत करण्यात आले.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*जागतिक महिला दिनानिमित्त पणजी गोवा,येथे विविध क्षेत्रात  कार्यरत महिलांना सन्मानीत करण्यात आले.*
             
*पणजी (गोवा )* :- 
*जागतिक महिला दिन ८ मार्च २०२० चे औवचित साधून,केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने,पणजी गोवा  युथ क्लब येथील कार्यक्रमात,विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या  गुण - गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेचे चेअरमेन मा.डॉ.मिलिंद  दयवाळ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांच्या अधिकार वर प्रकाश टाकण्यात आला.विविध राज्यभरातून  आलेल्या मान्यवरांनी आप - आपले विचार प्रगट करताना महिलाच्या सबलीकरण आणि शस्त्रीकरणावर भर दयावे,असे सांगितले.तसेच डॉ.मिलिंद दयवाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वाचे आभार मानले.
          याप्रसंगी डॉ.मिलिंद दयवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा संघटनेचे मानचिन्ह  देऊन  सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या सेक्रेटरी
मा.छायाताई खैरनार, याचा ही स्मुर्त्ती चिन्ह देऊन गुण गौरव करण्यात आले.सर्व महिलांना मानवधिकार संघटनेचे स्मुर्त्ती चिन्ह सोबत,गोवा राज्य स्त्री सन्मान पत्र ही देण्यात आले.
अश्या रितीने  केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने ,जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.