पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ओळख पटवण्याचे भिगवण पोलिसांचे आवाहन...
आज गुरुवार दि.१९/३/२०२० रोजी भिगवण पोलिसांना भिगवण स्टेशन भागात मकेच्या शेतात एक अल्पवयीन मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे.तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत असून,तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र तिची ओळख पटवणे अत्यंत गरजेचे आहे.मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा फोटो प्रसिद्ध करण्यावर अडचणी आहेत मात्र तिच्या हातावर जे गोंदलेले आहे त्यावरून कोणाला काही माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी भिगवण पोलिसांना याकामी मदत करण्यात यावी.संपर्कासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचा मोबाईल खालीलप्रमाणे...8552874434