सुनील देवधर यांचे 'सीएए'वर व्याख्यान*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*सुनील देवधर यांचे 'सीएए'वर व्याख्यान*


पुणे : शिवसमर्थ प्रतिष्ठान व मृत्युंजय अमावस्या विचारमंचा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. देवधर 'सीएए : आक्षेप आणि वास्तव' या विषयावर विवेचन करणार आहेत. 


येत्या रविवारी (दि. ८ मार्च) सायंकाळी ७.०० वाजता सनसिटी रोड, भाजी मंडई समोर, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथे हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका मंजुषा नागपुरे आदी उपस्थित राहणार आहेत, असे संयोजक दीपक नागपुरे यांनी सांगितले.