खडकवासला पावित्र्य मोहिम*💧

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


💧 *खडकवासला पावित्र्य मोहिम*💧
पुणे जिल्हाला व पश्चिम महाराष्ट्राला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण.येथे १०\०३\२०२० मंगळवार धुलिवंदन दिवशी रंग खेळून व खेळण्यासाठी काही अति उत्साही तरूण तरूणांनी येतात.व धरणामध्ये उतरून पाण्यामध्ये रंग खेळूतात यामुळे धरणातील पाणी दुषित करतात. या पार्श्वभूमीवर गड किल्ले संवर्धन संस्था.पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लवर्स पाॅईट गोर्हे रोड या ठिकाणी मानवी साखळी पकडून धुलिवंदन कलर खेळून पाण्यात जाणार्या अति उत्साही तरूण तरूणांनी आळा घालण्याचे काम करणार करण्यात आले. व पाण्यात रंग खेळण्यामुळे प्रदुषण होते. त्याची जनजागृती करण्यात आली. यामुळे धरणातील पाण्याचे व पाण्याती जलचर प्राण्यांचे रासायनिक रंगा मुळे होणार्या प्रदुषणा पासून रक्षण होते.संस्थेचे यंदाचे ४ वर्षे आहे. खडकवासला पावित्र्य मोहिमेची सुरवात सकाळी करण्यात आली.यावेळी गड किल्ले संवर्धन संस्थाचे अध्यक्ष साईनाथ जोशी, गणेश भुसेकर,रोहन पवार,माऊली रायरीकर,बाबु काळे व तरुण  सहाकारी सहभागी झाले होते. यावेळी हवेली पोलिस,पाटबंधारे विभाग व हिंदू जनजागृती समितीचे सहकार्य लाभले.