*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
'सूर्यदत्ता'मध्ये बुधवारी 'मेगा जॉब फेअर'
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि फ्रेशर्सजॉबफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे मोफत मेगा जॉबफेअरचे आयोजन केले आहे. येत्या बुधवारी (दि. ४ मार्च) सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत बावधन येथील सूर्यदत्ता शिक्षण संकुलात हा नोकरी मेळावा होणार आहे, या जॉबफेअरमध्ये ४० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून, तरुणांना विविध पदांच्या नोकरीची संधी देणार आहेत. 'सुर्यदत्ता ग्लोबल सीएसआर इनिशिएटिव्ह फॉर इंटर्नशीप अॅन्ड प्लेसमेंट्स’ व 'इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरफेस इनिशिएटिव्ह' उपक्रमाअंतर्गत या जॉबफेअरचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बेरोजगार युवक आणि उपलब्ध नोकऱ्या यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील सर्व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, बीई, बी.टेक, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमा अशा अभ्यासक्रमातील फ्रेशर्स व अनुभवी तरुणांसाठी हा नोकरी मेळावा एक पर्वणी असते. गेल्या वर्षीच्या मेळाव्यात १२०० पेक्षा अधिक तरुणांनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बहुराष्ट्रीय (एमएनसी) कंपन्या यामध्ये भाग घेऊन तरुणांना नोकरीची संधी देतात. इन्फोसिस, युरेका फोर्ब्स, एनआयआयटी, एचडीएफसी, रिलायन्स, टीएसएल, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस, रॉयल एन्फिल्ड, टाटा स्ट्राईव्ह, एलआयसी, फिनो बँक, खेतीवालो ऑर्गनिक्स, युटीएस, एचडीबी आदी कंपन्यांचा समावेश असून, एचआर, फायनान्स, डेव्हलपर, सेल्स, आयटी, सिव्हिल आदी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी असते."
२९ वर्ष वयापर्यंतच्या तरुणांना यामध्ये भाग घेता येणार आहे. इच्छूकांनी आपल्या बायोडेटाच्या ८-१० प्रतीं व कागदपत्रांसहित मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी ८.०० वाजता उपस्थित राहावे. हा मेळावा पूर्णपणे मोफत आहे. मात्र, नियोजनासाठी नोंदणी आवश्यक असून, त्याकरिता उमेदवारांनी www.freshersjobfair.in संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा श्रीधर गुटी (sridhar.gooty@gmail.com) ९७३९३३६३३०, ८५५५०३४६२९, ८३४१२३५२६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*