समाज सेवेला गिट्टीखदान पोलिस पुढे सरसावले ...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


समाज सेवेला गिट्टीखदान पोलिस पुढे सरसावले ...
-------------------------------------
नागपूर:-दि.२६मार्च(सविता कुलकर्णी):- "कोरोना वायरस" (कोविड-19) च्या वातावरण महाराष्ट्रात नसून संपूर्ण भारत देशात "कोरोना वायरस" निर्माण झाले आहे.  पण या वायरसला नागरीकांनी चांगला प्रतिसाद नागपूर पो.कमिशनर डाँ. भूषण कुमार उपाध्याय  ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अधिकारी वर्ग ही आपले कर्तव्य दक्ष सांभाळताना सुद्धा समाज सेवेला पुढे सरसावले आहेत. आज दिनांक 26.03.20.रोजी दुपारी 1.00 वा. पो.उप-आयुक्त (डिटेक्शन) गुन्हे, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुधिर नंदनवार, पोलिस निरीक्षक पिटूरकर यांच्या हस्ते गुन्हे शाखेतील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी नविन पोलिस वसाहत,गिट्टीखदान,मागिल भागात वास्तव्याला असलेले मजुर मंडळींना( पुरुष, महिला व लहान मुले, सर्वांना) फूड पँकेट वितरीत करण्यात आले. 


      इतकेच नव्हे तर नियमित कर्तव्य बजावून उपरोक्त प्रमाणे काही वेळ काढून सामाजिक कर्तव्य देखिल मोठ्या स्फूर्तीने पार पाडले.


नागपूर पोलीस विभागाचे जनतेने आभार मानले.