नेरळ स्टेशन मधील लोखंडी रेलिंगमुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायावर मंदी..  रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


नेरळ स्टेशन मधील लोखंडी रेलिंगमुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायावर मंदी.. 

रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

कर्जत,दि. 3  गणेश पवार

                            मध्य रेल्वे च्या मेन लाईन वरील कर्जत एन्ड कडील नेरळ रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे अनेक रस्ते बंद केले आहेत.त्यामुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून ममदापूर आणि नेरळ बाजारपेठ मध्ये व्यवसाय करणारे रिक्षाचालक यांचा व्यवसायीक ठप्प झाला आहे. दरम्यान,मध्य रेल्वे प्रशासनाने रिक्षा चालक यांचा व्यवसाय लोखंडी रेलिंग लावल्याने बंद झाला असून पत्री पूल येथील रस्ता खुला करावा आणि युनियन बँक येथील रिक्षा स्टँड पुन्हा सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

                             नेरळ रेल्वे स्थानकात मागील काही दिवसांपूर्वी महाव्यवस्थापक दौऱ्यावर आले होते,त्यामुळे त्यांना दाखविण्यासाठी नेरळ स्थानकात येणारे रस्ते मध्य रेल्वे कडून बंद करण्यात आले होते.त्यात युनियन  बँक भागात रिक्षा वाहतूक करणाऱ्या नेरळ गावातील 15 रिक्षाचालक यांना रेल्वेने तेथून हटवले.त्यानंतर गेली महिनाभर त्या रिक्षाचालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.ते सर्व रिक्षाचालक मागील महिन्यापासून 100 रुपये देखील घरी घेऊन जात नाहीत.त्यामुळे युनियन बँक परिसरात मध्य रेल्वेच्या जागेत रिक्षा स्टँड सुरू करण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात अनेक बैठक घेतल्यानंतर तेथे स्टँड सुरू झाले होते.त्यामुळे मध्य रेल्वेने त्या सर्व रिक्षाचालक यांना व्यवसाय सुरू करून घ्यावा या मागणी साठी भारतीय जनता पार्टी रेल्वेला विनंती करणार आहे.

                          दुसरीकडे नेरळ स्टेशन येथून दामत,ममदापूर आणि भडवळ भागात जाणाऱ्या रिक्षाचालक यांच्यासाठी प्रवासी येणारा मार्ग मध्य रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे.नेरळ स्थानकातून मुंबई एन्ड कडे असलेला पत्री पूल येथून त्या भागातील रहिवासी यांना येण्याचा मार्ग बंद केला आहे.त्या ठिकाणी लोखंडी बेरीकेट लावल्याने आणि ते कायमस्वरूपी असल्याने तेथे व्यवसाय करणारे 100 हुन अधिक रिक्षाचालक यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.रस्ताच बंद केल्यावर प्रवासी त्या रस्त्याने येण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही आणि त्यामुळे त्या सर्व रिक्षाचालक यांचे दिवसातून एकदाच भाडे मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील असलेले ते सर्व रिक्षाचालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे त्या सर्व रिक्षाचालक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*