स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’च्या सेटवर रंगांची झाली उधळण सेटवर झालं होळीचं धमाकेदार सेलिब्रेशन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


स्टार प्रवाहवरील वैजू नंबर वनच्या सेटवर रंगांची झाली उधळण


सेटवर झालं होळीचं धमाकेदार सेलिब्रेशन‘रंगून जाऊ रंगात आता


होऊ स्वैर स्वच्छंद


तोडून सारे बंध उधळू आनंद आणि फक्त आनंद’


 


वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागली की आपोआपच होळी सणाचे वेध लागतात. रंगांची मनसोक्त उधळण करत आपापसातले हेवेदावे विसरायला लावणारा हा सण. रंगांच्या या सणाचं धमाकेदार सेलिब्रेशन स्टार प्रवाहवर ९ मार्च म्हणजेच होळीच्या दिवशी सुरु होणाऱ्या ‘वैजू नंबर वन’च्या सेटवरही पाहायला मिळालं. इकोफ्रेण्डली रंगांची उधळण करत ‘वैजू नंबर वन’च्या टीमने सेटवर धमाल केली. या अनोख्या सेलिब्रेशनसाठी तिसरी मंझील चाळ सज्ज होती. ढोल-ताशे, पताका आणि पुरणपोळीचं सुग्रास जेवण असा बेतही ठरला होता. खास बात म्हणजे तिसरी मंझीलच्या या होळी सेलिब्रेशनसाठी खास पाहुणे म्हणून संजय जाधव यांनीही खास हजेरी लावली. ढोल-ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. तिसरी मंझीलच्या रहिवाश्यांचा हा जोश पाहून संजय जाधवही भारावून गेले.


 


तिसरी मंजिल चाळ नावाप्रमाणेच थोडी फिल्मी आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली मंडळी या तिसरी मंजिलमध्ये अगदी गुण्यागोविंदाने रहातात. त्यामुळेच निमित्त कोणतंही असो विविधतेतील एकता इथे पाहायला मिळते. टोलेजंग इमारतींच्या शहरात चाळसंस्कृती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चाळ हा प्रत्येकाच्या मनातला असा एक हळवा कोपरा आहे ज्याच्या आठवणी पुसणं हे केवळ अशक्य आहे. वैजू नंबर वन मालिकेतलं हे २२ खोल्यांच कुटुंब तुम्हाला नक्कीच निखळ मनोरंजन देईल. दैनंदिन आयुष्यतल्या घडामोडीं मजेशीर पद्धतीने या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येतील. होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ९ मार्चपासून रात्री १० वाजता वैजू नंबर वन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 


सोनाली पाटील ही नवोदित अभिनेत्री वैजू शिर्केची भूमिका साकारत असून समीर खांडेकर वैजूच्या पतीच्या म्हणजेच सुशील शिर्केच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ईला भाटे, अविनाश नारकर, मिहिर राजदा, प्रभाकर मोरे, संजीवनी जाधव, श्रीजीत मराठे, नीता पेंडसे, संजय कुलकर्णी, भरत सावले, मीनल बाळ अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत दिसणार आहे. होलाका क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली असून संजय जाधव, प्रोमिता जाधव, हर्षदा खानविलकर आणि दिपक राणे या मालिकेचे निर्माते आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.


तेव्हा मनोरंजनाची ही अनोखी मेजवानी पहायला विसरु नका. नक्की पहा नवी मालिका ‘वैजू नंबर वन’ ९ मार्चपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*