पुण्यात धुळवडीदरम्यान तुफान राडा, दोन गटात हाणामारी; रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यात धुळवडीदरम्यान तुफान राडा, दोन गटात हाणामारी; रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड
____________________________________


संपूर्ण राज्यात धुळवड साजरी होत असताना पुण्यात मात्र सणाला गालबोट लागलं आहे. धुळवड खेळताना दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसंत एकमेकांचा पाठलाग करत तरुणांकडून दगडफेकही करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही काही कारणास्तव भांडण झालं. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही. मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सीसीटीव्हीत तरुणांचा एक गट दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. तसंच रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोडही करत आहेत. यानंतर समोरील गटातील तरुण हातात काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत. चतुःशृंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पण या प्रकारामुळे परिसरात भीतीचं तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे.