पुणे प्रवाह न्युज पोर्टल
महिला राष्ट्रवादी काॕंग्रेस तर्फे गुणवंत महिलांचा सत्कार .
दि.८-- जागतिक महिला दिनानिमित्त सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाम.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्ह्यातील गुणवंत महिलांचा सत्कार महिला राष्ट्रवादी काॕंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सौ.छाया पाटील व जिल्हा कार्यकारणी महिला
सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रवादी काॕंग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू प्रेरणा गायकवाड (खानापूर),आदर्श डाॕक्टर साजिदा चौगुले (वाळवा),आदर्श शिक्षिका सुशीला लोहार(वाळवा ),शहीद जवानाची वीरपत्नी सुनीता पाटील (तासगाव), आदर्श व्यवसायिका नीता गोसावी(शिराळा),आदर्श वकील योगीता माने(तासगाव ),आदर्श बचतगट संघटना वैशाली पाटील (पलुस),मेडिसिन व्यवसाय जयश्री काळगी(जत) यांचा सत्कार शाल,महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान चिन्ह तसेच जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सौ.छाया पाटील यांनी लिहिलेले सावित्रीबाई फुले यांचे चरित्र व साडी-चोळी देवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला राष्ट्रवादी काॕंग्रेसच्या कार्यकारणीमधील मंजुषा पाटील,बिस्मिल्ला मुलाणी,वैशाली मोहिते , अरूणा जाधव ,चारुलता पाटील , मृणाल पाटील ,मीनाक्षी आक्की,नंदा पाटील ,सुवर्णा पाटील ,रुपाली भोसले,मनिषा पाटील ,उल्का माने ,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष पूजा लाड,माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के(शिराळा)अशा मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेसप्रेमी महिला मोठ्या
संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी छाया पाटील , मीनाक्षी आक्की,अरूणा जाधव,चारूलता पाटील यांनी मनोगते व्यक्त केली .पूजा लाड यांनी आभार मानले.