सामाजीक परिवर्तनाच्या ध्यासाचा महोत्सव म्हणजेच रमाई मोहत्सव ः- ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस

सामाजीक परिवर्तनाच्या ध्यासाचा महोत्सव म्हणजेच रमाई मोहत्सव ः- ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस


पुणेः- पुण्यासारख्या शहरात अनेक महोत्सव होत असतात, ते उत्तमच असतात. त्याच महोत्सवांमधील सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन वाटचाल करीत असणारा महोत्सव म्हणुन रमाई महोत्सवाकडे पाहिले जाते असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 


फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचातर्फे आयोजीत रमाई महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न केल्याबद्दल महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आणि पुणे शहर जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल गायकवाड यांचा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थाई समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका लता राजगुरु यांचा देखील सत्कार करण्यात आला. 


यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेस बागवे, पंडित वसंत गाडगीळ, कुणाल राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते. 


सबनीस म्हणाले, संविधानात जे अभिप्रेत आहे तेच या महोत्सवात चालते. सर्व जाती-धर्मांच्या भिंती तोडून या महोत्सावाने सर्वसमावेषकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. जाती पेक्षा रमाईंच्या विचारांवर जे अनुयायी दावा सांगतात त्यांचा हा महोत्सव आहे.पुण्यातील सांस्कृतीक गाभ्यातला हा महोत्सव झाला आहे. 


यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी पुरस्काराला थोडक्यात उत्तर दिली. याप्रसंगी नगरसेविका लता राजगुरु आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेस बागवे यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केली.


छायाचित्र ओळीः-
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचातर्फे आयोजीत रमाई महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न केल्याबद्दल महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आणि पुणे शहर जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल गायकवाड यांचा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.