पुणेकरांना झुकते माप देणारा अर्थसंकल्प - प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीसाठी


पुणेकरांना झुकते माप देणारा
अर्थसंकल्प


- प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी


पुणे - पुण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गाचा विस्तार आणि नवीन मार्गिका, रिंग रोडसाठी भरीव तरतूद करून अर्थमंत्री अजित पवार यांनी अंदाजपत्रकात पुणेकरांना झुकते माप दिले आहे. अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.


भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाच वर्षे पुण्याकडे दुर्लक्ष केले होते. महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र ही उणीव भरून काढली आहे. शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने अर्थमंत्र्यांनी अंदाजपत्रकात तरतुदी केल्या. वनाज कॉर्नर ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली असा विस्तार केला ही बाब अभिनंदनीय आहे. रिंगरोड या महत्त्वाच्या विषयालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापनाही अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली आहे. नोकरी करणाऱ्या मागास महिलांसाठी पुणे येथे एक हजार निवासी क्षमतेचे वसतीगृह, मागास वर्गीय मुलामुलींसाठी पुणे विद्यापीठात पाचशे निवासी क्षमतेचे वसतीगृह बांधण्यात येणार आहे.


पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिका क्षेत्रातील दस्त, नोंदणीच्या वेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क व इतर निगडीत भारामध्ये पुढील दोन वर्षांच्या कालावधीकरता एक टक्का सवलत देण्यात आली ही बाबही स्वागतार्ह आहे असे जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.