पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नुकत्याच साज-या झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब पुणे कर्वेनगर तर्फे “स्रीत्व सन्मान” करण्यात आला.९ अशा महिलांचा सन्मान केला.ज्यांनी वेग वेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.दामले हॉल कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रमात रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्ष रो.आशा आमोणकर,नियोजित प्रांतपाल रश्मि कुलकर्णी व विशेष अतिथि मेधा कुलकर्णी या होत्या.तसेच सहाय्यक प्रांतपाल नीलम पाठक,रोटरी युथ एक्स्चेंजच्या ब्राझिलच्या लॉरेन व बिया,कोलंबियाची कमिला,आदि मान्यवरांच्या बरोबरच शामराव श्रीपती बोराटे शाळा वारजेच्या विद्यार्थिनी व रोटरी सदस्य उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त -१)आरती ठाकुर-कुंडलकर –संगीत गौरव,२)प्रीती वैद्य-समाजगौरव,३)मीरा बडवे-कार्य गौरव,४)गायत्री महादेवकर-कला गौरव,५)गायत्री जोशी-क्रीडा गौरव,६)स्मिता घैसास-व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,७)डॉ.पूर्णा भरादे-क्रीडा गौरव,८)अनुजा कुलकर्णी –सेवा गौरव,९)डिसीपी पौर्णिमा गायकवाड-रणरागिणी पुरस्कार.पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ,व मानपत्र असे होते.
छायाचित्र :पुरस्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.