खडकी येथे खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन व ‘‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृह’’ असे नामकरण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


खडकी येथे खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन व ‘‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृह’’ असे नामकरण शनिवार दिनांक 14 मार्च 2020 रोजी स्व.चंद्रकातजी छाजेड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी संस्धेचे मानद अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. एस. के. जैन, कॉंग्रेसचे माजी आमदार उल्हास  पवार,  माजी  मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर  दत्ताजी गायकवाड,  अभयजी छाजेड, माजी  स्थायी समिती अध्यक्ष  आबा बागूल, नगरसेवक विजय शेवाळे, उज्ज्वल केसकर, नगरसेवक अविनाश सालवे, नगरसेविका सुनीता वाडेकर, मंगला मंत्री ,भुजंग लव्हे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष मा. दुर्योधनजी भापकर आदी मान्यवर 
  प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.  या प्रसंगी  स्व.तुकाराम भापकर बालोद्यान, कुस्तीचे मैदान  अद्ययावत रायफल शुटींग रेंज यांचेही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्धेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल हे होते.
   माजी पर्यटन राज्यमंत्री आदरणीय स्व.चंद्रकांतजी छाजेडसाहेब हे    खडकी शिक्षण  संस्थेचे चिटणीस  म्हणून 42 वर्षे कार्यरत होते. गोरगरीब,दुर्बल घटकांतील गरजूंना शिक्षणासाठी प्रेरित करून शिक्षण व रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले केले.संस्थेच्या विकासात भरीव योगदान त्यांनी दिले.  त्यांच्या या अविस्मरणीय व अजोड कार्याचा परिचय करून देणारी  चित्रफीत यावेळी  दाखविण्यात आली.   त्यांना सहकार्य  करणारे ज्ञानेश्वर मुरकुटे, चंद्रकांता जंजिरे,बालम सालवी, भीमराव बनसोडे,  अशोक पगारिया,  विलास राठोड, संजय क्षिरसागर, संतोष जगदने आदी कार्यकर्त्यांना स्मृतिचिन्ह,  डऑ. अलका  झिमरै लिखित कर्यामयोगी पुस्तक,  मोत्याअंची माला व पुष्पगुच्छ  देऊन वेळी सन्मानित करण्यात आले.
संस्थेची विद्यार्थिनी श्रद्धा तान्बे , पुणे-अमृतसर सायकलप्रवास करणारे अमोल वाजपेयी यान्चा यावेळी सत्कार करण्यात आला. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  खडकी शिक्षण संस्धेचे  सहसचिव शिरीष नाईकरे यानी केले. सचिव श्री. आनंद चंद्रकांत छाजेड यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलासराव पंगुडवाले,
, संचालक राजेंद्र भुतडा, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, रमेश अवस्थे, महादेव नाईक, निर्मला छाजेड, अर्चना लुणावत, राहुल छाजेड, मुख्याध्यापक राजेंद्र अवधूतकर, उपप्राचार्य तानाजी गायकवाड, पालक प्रतिनिधी कैलास टोणपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक,अध्यापक, पालक प्रतिनिधी  व परिसरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद ढेकणे व मीननाथ कचरे यांनी केले.