विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटले हसू* *( ‘ब्लाइंड गेम’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगाला उपस्थिती )* ★■◆★◆◆ या नाटकातील सर्व कलाकार आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत साप्ताहिक पुणे प्रवाह दिनदर्शिकांचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Respected sir / Madam,


Press Release
                                                                                 *विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटले हसू*


*( ‘ब्लाइंड गेम’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगाला उपस्थिती )*


                  प्रसिद्ध नाट्य लेखक रत्नाकर मतकरी यांच्या गूढ लेखणीचा थराराची अनुभूती देणारे ‘ब्लाइंड गेम’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग नुकताच बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पार पडला. या रौप्य महोत्सवी प्रयोगाला प्रमुख उपस्थिती म्हणून विशेष मुलांनी हजेरी लावली होती. रोजच्या त्यांच्या दिनक्रमात हा दिवस त्यांच्यासाठी वेगळा होता. कमी कालावधीच या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून उत्तम कथानक, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय व उच्च तांत्रिक मूल्यांमुळे रसिक प्रेक्षकांना या नाटकाने मोहिनी घातली आहे. या नाटकाची अनुभूती नुकतीच विशेष मुलांनी घेतली.


       गूढ कथानक असलेल्या या नाटकामध्ये विशेष मुले रमून गेली होती. नाटकातील एक अंध व्यक्ती कशी संकटावर मात करून आयुष्याला नवी  उभारणी देते. प्रेरणादायी गोष्ट या नाटकातून मुलांनी अनुभवली. “एका घरात एक फोटोग्राफर आणि त्याची बायको राहतात. त्याच इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर  एक शाळकरी मुलगीही रहात असते. एक विलक्षण घटना घडते आणि मग ती मुलगी आणि फोटोग्राफरची बायको आलेल्या रहस्यमय संकटाला कशी मात देतात हे” 'ब्लाईंड गेम ' या नाटकाचं कथानक आहे.


             या नाटकाचे दिग्दर्शक अनिल खोपकर, नेपथ्य श्याम भूतकर, प्रकाश, राहुल जोगळेकर, संगीत, तेजस चव्हाण, रंगभूषा, नरेंद्र वीर सूत्रधार शेखर दाते, नरेंद्र मोहिते, तर कलाकार, भाग्यश्री देसाई, शिवराज वाळवेकर, ऋतुजा जोशी, आशुतोष नेर्लेकर, डॉ. संजीवकुमार पाटील, दीपक रेगे अशा कलाकार या नाटकात आहेत.


★★★★★★★★★★★★★★★■■■■■★★★


            या नाटकातील सर्व कलाकार आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत साप्ताहिक पुणे प्रवाह दिनदर्शिकांचे प्रकाशन करण्यात आले.


★★★★★★★★★★★■■■■■★★★★★★★