स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयलच्या सर्व कलाकार व टीमचे मनःपूर्वक आभार

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयलच्या सर्व कलाकार व टीमचे मनःपूर्वक आभार...!!


एक काळ असा होता जेव्हा तेजस्वी पराक्रमी बुद्धिमान धर्मशास्त्र पंडित  छत्रपती संभाजी महाराज यांना सतत बदनाम केले जात होते परंतु काही इतिहासकारांनी त्यांच्या संशोधनाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि याच ऐतिहासिक संदर्भांचा वापर करून आपण सीरियल च्या माध्यमातून स्वराज्यरक्षक संभाजी महाराज घराघरात  पोहोचवले...


आपल्याला तेव्हाचा तो काळ अनुभवता आला नाही परंतु स्वराज्य रक्षक संभाजी या सिरीयल मुळे छत्रपती संभाजी महाराज प्रत्येकाला अनुभवायला मिळाले ....


 महाराणी येसूबाई यांचा तो त्याग आणि स्वराज्य राखण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज , संताजी-धनाजी , छत्रपती ताराराणी सरकार , छत्रपती थोरले शाहू महाराज आणि असंख्य मावळ्यांची धडपड व पराक्रम नेहमी लक्षात ठेवावा आणि संपूर्ण जगाला सांगावा असा आहे...


पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक संभाजी टीमचे आणि जगदंब क्रिएशन चे मनःपूर्वक आभार..🙏🙏


जय जिजाऊ 
जय शिवराय 
जय शंभूराजे 


🙏🚩🙏


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*