धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळ्याचा अति महत्वाच्या निर्णय ....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🚩 *धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळ्याचा अति महत्वाच्या निर्णय ......*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      काल सह्याद्री भवन येथे पालखी सोहळ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव , शासन निर्णय व पालखी सोहळा या बाबत चर्चा करण्यात आली .
      त्यावेळी खजिनदार शिवाजी शिवले ,  भाऊसाहेब शिंदे , विपुल शितोळे , पांडुरंग आरगडे , महेशराव टेळे , उत्तमराव कामठे , दशरथ वाळके , संकेत जाधवराव , नंदा जाधव इ. आपले विचार मांडले . सर्वांचे विचार लक्षात घेता खालील प्रकारे निर्णय घेण्यात आला ...
 1) पालखी सोहळ्याचा 3 दिवसाचा कार्यक्रम रद्द करुन तो 1 दीवस करण्यात आला.
2) पालखी सोहळा पायी होणार नसुन तो गाडी ने होणार आहे .
3) काही मोजक्या शिवशंभुभक्तांनीच पालखी सोहळ्याला उपस्थित रहायचे आहे .
4) तोंडाला मास्क / रुमाल लावने  , गाडीला भगवा ध्वज असणे बंधनकारक असणार आहे .
5) साधा खोकला , सर्दी , अशक्तपणा असला तरी पालखी सोहळ्यात  सहभागी होण्यास बंदी असणार आहे .
6 ) 24 तारीखेला सकाळी 9.00 वाजता नारायणपुर येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होऊन दुपारी 12.00 वाजता बलिदान भुमी तुळापुर येथे आरती होईल व दुपारी 1.30 वाजता वढु ब्रु समाधी स्थळी आरती होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल .


आपले नम्र 
*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समिती*