उपविभागीय पोलीस आधिकारी आणि कर्जतच्या व्यापारी यांचा उपक्रम कर्जत तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यात 150 कूटुबाना लाभ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


उपविभागीय पोलीस आधिकारी आणि कर्जतच्या व्यापारी यांचा उपक्रम

कर्जत तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यात 150 कूटुबाना लाभ

कर्जत,ता.29  गणेश पवार

           हातावर पोट असलेल्या कुटुंबाची झालेली गैरसोय लक्षात घेऊन त्या लोकांच्या दारात जाऊन मदत करण्यास सुरुवात झाली आहे.कर्जत तालुक्यातील तीन आदिवासी कातकरी वाडीमध्ये व्यापारी आणि अधिकारी हे मदत घेऊन पोहचले असून दिशा केंद्र चे अशोक जंगले यांनी आवाहन केले होते.

                कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी देशभरात लागु झालेल्या लाँकडाउन मूळे रोजमजूरीवर गूजरण करणाऱ्या कर्जत तालुक्यातील आदिम जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळणे साठी त्याना कोरडा शिध्दा वाटप करण्याचे आवाहन कर्जत मधील सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यानी केले होते.या आवाहनाला प्रतीसाद देत कर्जत चे उपविभागीय पोलीस आधिकारी अनिल घेरडीकर यांच्यासह कर्जतचे व्यापारी अमीत पारस ओसवाल ,मनोज पारस ओसवाल,जंयतीलाल शेषमाल परमार यांच्या वतीने आदिवासी ना त्याच्या घरी जाउन धान्याचे वाटप करण्यात आले .

                     तालुक्यातील जाभूळवाडी,वडाचीवाडी आणि वंजारवाडी येथील 150  कूटूबाना प्रत्येकी दहा किलो तादूळ ,दोन किलो साखर ,चहा ,मिठ ,मसाला पावडर ,दोन किलो तेल ,हळद आदि समावेश असलेले किट देण्यात आले.ही मदत वाटप करताना शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टन्सचे काटेकोर पणे पालन करण्यात आले.दोन व्यक्ती मध्ये किमान मीटरभर अतर पाळत,तोडावर मास्क किवा रूमाल लावून एकाघरातील एकच व्यक्ती बाहेर येत शिस्तबध्द पणे गोधळ गडबड न करत या मदतीचे वाटप करण्यात आले.ज्या कुटुंबांना गरज आहे त्याना व्यापाऱ्यांच्या मदतीने हा प्रयत्न सुरू केला आहे.जिल्हास्तरावरून सरकारच्या वतीने अशी मदत दिली जावी अशी विनंती केली आहे अशी माहिती घेरडीकर यानी यावेळी दिली.अमीत पारस ओसवाल म्हणाले की ज्याना तातडिची गरज आहे त्यानां ही मदत देतना विशेष आनंद होत आहे कारण ज्याना गरज आहे त्याना प्रत्यक्ष लाभ होत आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले ,जाभुळवाडी चे रवी भोइ ,पोलिस कर्मचारी ,व्यापारी प्रतीनिधी उपस्थित होते .