कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द
  पुणे दि.12: स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. 15 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हास्तर व तालुका स्तरावरील प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबीरे, कार्यशाळा, ग्राहक संरक्षण संबंधित विषयावर निबंध, चित्रकला, भित्तीपत्रके, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रम आयोजित केले जाणार होते. त्यामुळे या कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर ग्राहक भेट देण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेता कोरोना रोगाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. सर्वांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन रद्द करण्यात आला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image