जिल्हाधिकार्यांनी अश्वासन दिल्या नंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीसाठी
मा. संपादक, ...........
     *जिल्हाधिकार्यांनी अश्वासन दिल्या नंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित.*
 न्यू फलटण शुगर वर्कस या साखर कारखान्याकडील ऊस बिलाची थकित रक्कम वसुल करण्यासाठी जिल्हाधिकारी कारयालया समोर सुरू असलेले घेराव आंदोलन आज जिल्हाधिकर्यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित केले असल्याची माहीती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली
        न्यू फलटण शुगर वर्कस व श्री दत्त शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे थकित असलेली ऊस बिलाची रक्कम शेतकर्यांना मिळावी यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन दिवसा पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर घेराव आंदोलन सुरु केले होते. दुसर्या दिवशी दुपारी शेतकर्यांनी चुल पेटवुन भात शिजवुन खाल्ला. 
      संध्याकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेतकर्यांशी चर्चा करुन विषय समजुन घेतला. शेतकर्यांची किती रक्कम नक्की कारखान्य‍कडे येणे बाकी आहे याची खात्री करुन शेतकर्यांना लवकरात लवकर पेमेंट करण्यास कारखान्याला भाग पाडू असे अश्वासन जिल्हाधिकार्यानी दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दुसर्या दिवशी आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
      दरम्यान दि. ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात एन सी एल टी विरोधात केलेल्या अपीलमध्ये शेतकर्यांचे प्रतिनिधी पार्टी करण्यात आले. १५ मार्च पर्यंत श्री. दत्त शुगर मिल्सला सर्व माहिती उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिलीआहे.
    आंदोलनाचे नेतृत्व अनिल चव्हाण, सीमाताई नरोडे, सुरेश साप्ते, मानिक बोबडे, दादा काळे, किरण जाधव आदी कर्यकर्त्यांनी केले.
   ५/३/२०२०
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.