पुणे प्रवाह न्युज पोर्टल
🔹COVID-19 बाबत तपासणी कार्यवाही🔹
आदरणीय सर, नमस्ते.
आज दि.13 मार्च 2020 रोजी स्पाइसजेट एअरलाइन्सचे फ्लाईट न.SG 52 ,दुबई ते पुणे -
आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे येथे पहाटे 04:05 वा पोहोचलेली असून त्यामध्ये पुरुष=74,स्त्री=41, लहान मुले=10 आणि लहान बाळ=04 असे एकूण=129 प्रवासी आलेले आहेत.त्यामध्ये भारतीय नागरिक 118 असून परदेशी नागरिक 11आहेत.सर्वांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्यात आलेली आहे.सदर तपासणीमध्ये COVID-19 संदर्भात संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नाहीत.
15 फेब्रुवारी 2020 नंतर ते आजमितीपर्यंत चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून प्रवास करून आलेले कोणीही नाहीत.
तथापी दोन भारतीय नागरिक पैकी एक महिला (वय वर्षे-26 ) आणि त्यांचे लहान बाळ ,(वय वर्ष-01), यांनी स्वतःहून आजारी (कफ)असल्याचे नमूद केलेले त्यांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथे पाठवण्यात आलेले आहे.
उर्वरित सर्व प्रवासी यांना आपले स्वतःचे घरी Isolation मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे जिल्हा प्रशासन ,पुणे विमानतळ व्यवस्थापन , वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आजची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे.🙏