अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो नवउद्योजक घडविणार : छावाप्रमुख धनंजय जाधव*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो नवउद्योजक घडविणार : छावाप्रमुख धनंजय जाधव*


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना व कार्याविषयी नवउद्योजक तरुणांना माहिती मिळावी म्हणून आज दिनांक १ मार्च २०२० रोजी आनंद विहार धानोरी पुणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीमध्ये महामंडळाचे संचालक छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी तरुणांनी उद्योग कोणत्या पद्धतीचे केले पाहिजेत, जेणेकरून महामंडळांच्या योजनांचा लाभ घेता येईल व योजना मिळण्यासाठी कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. 


या बैठकीत महामंडळाचे पुणे जिल्हा समन्वयक संकेत लोहार यांनी विस्तृत पद्धतीने महामंडळाचे कार्य समजून सांगितले. एखादा व्यवसाय करत असताना मानसिकता कशी हवी व्यवसाय नियोजन कसे असावे याविषयी सोनियाताई सावंत यांनी अतिशय छान मार्गदर्शन केले.


महिलांनी उद्योजक व्हावे म्हणून छायाताई भगत यांनी उपस्थितांना संबोधित केले.महामंडळाच्या माध्यमातून अनेक उपयुक्त योजना आहेत व्यवसाय कोणताही असो महामंडळ व्याज परतावा योजना देणार याविषयी छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी शाश्वती दिली. जास्तीत जास्त लोकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना गणेशदादा सोनवणे यांनी तरूणांनी नोकरी पेक्षा उद्योजक व्हावे असे सांगितले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*