*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
नेरळ रेल्वे स्थानकात मराठी भाषा दिनानिमित्त रंगवली मधून शुभेच्छा, प्रवाशांना दिवसभर मराठी गाण्याची मेजवानी
कर्जत,दि .27 गणेश पवार
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात मराठी भाषेबद्दल माहिती देणारी रांगोळी काढली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार युनिटच्या नेरळ-शेलू-वांगणी युनिटच्या माध्यमातून ही रांगोळी काढली आहे.
आज 27 फेब्रुवारी असून कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून राज्यात मराठी भाषा दिन साजरा होत असताना नेरळ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलग दुसएय वर्षी प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी भली मोठी रांगोळी काढण्यात आली आहे.राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळी च्या माध्यमातून नेरळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार युनिटने केला आहे.या युनिटच्या नेरळ-शेलू-वांगणी युनिटने हा उपक्रम केला असून सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनसे रेल्वे कामगार सेना युनिट कार्यकर्ते शुभेच्छा देत होते.
दुसरीकडे मराठी भाषा दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी भाषेतील जुनी अजरामर गाणी ध्वनिक्षेपकावर वाजवली जात होती.त्यामुळे नेरळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या सर्वांना नेरळ स्थानकात मराठी भाषा दिनाचा फील जाणवत होता.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*