*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
।।मराठीभाषा उत्सव साजरा।।
*जागतिक मराठी राज्यभाषा दिनानिमित्त सहकारनगर येथे अनोखा उपक्रम*
27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी राज्यभाषा दिन संपूर्ण जगभर विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. आपल्या भागातील *कार्यक्षम व आदर्श नगरसेविका सौ अश्विनीताई नितीन कदम* यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या *अक्षर बागेत मी पुणेकर* या *स्वयम् चित्र कट्ट्याचे (सेल्फी पॉइंट) लोकार्पण आज करण्यात आले.*
सदर प्रसंगी प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर ,प्रा. चित्रकार अनंत ढेरे , श्री नितीनभैय्या कदम- (पर्वती अध्यक्ष) , श्री सुनील बोरवलेसर, ॲड.सुनिल व्हावळ,सम्राट नाईक, शंकरराव सहाने,अमोल ननावरे, तुषार नांदे, रुषिकेश भुजबळ,सचिन जमदाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपली भाषा ...आपली अस्मिता असा शुभेच्छा फलक नागरिकांसाठी लावण्यात आला होता . तसेच लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मराठीतून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर वळणदार हस्ताक्षर कसे असावे असे प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात आले होते. मराठीतून बालगीते , मराठीतून पात्र वाक्य बोला , मराठी म्हणी व वाक्यप्रचार लिहा,मराठी कवी,लेखक नावे सांगा, मराठी चित्रपटांची नावे सांगा, एक मिनिटात जास्तीत जास्त अक्षरे जोडा,अक्षरांची गाडी,अक्षरांचे झाड असे विविध खेळांचे आनंद परिसरातील लहान मुलांनी व नागरिकांनी घेतला. विजेत्यांना मराठी शब्दकोष व मराठी पुस्तके बक्षिश म्हणुन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोनिका जोशी यांनी केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*