सम्यक ट्रस्टतर्फे वंचित विद्यार्थ्यांसाठी मोराची चिंचोली येथे सहलीचे आयोजन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


सम्यक ट्रस्टतर्फे वंचित विद्यार्थ्यांसाठी
मोराची चिंचोली येथे सहलीचे आयोजन

 

पुणे : सम्यक ट्रस्टतर्फे ताडीवाला रोड येथील श्री समर्थ श्रीपती बाबा जनता प्राथमिक विद्यालयाच्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी मोराची चिंचोली येथे सहलीचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनातून विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळावा, त्याचबरोबर सहलीच्या माध्यमातून निसर्गाचे सौंदर्य पाहता यावे, यासाठी दरवर्षी अभ्यास सहलीचे ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात येते, असे ट्रस्टचे मुख्य सचिव बाळासाहेब जानराव आणि संचालक अशोक कांबळे यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी ही सहल शाळेतून निघाली.

 

यावेळी सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष नगरसेवक महेश लडकत, ऍड. मंदार जोशी, अतुल लुंकड, महिपाल वाघमारे, मुख्याध्यापक महादेव कांबळे उपस्थित होते. बाळासाहेब जानराव म्हणाले, "ज्या मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा ५० विद्यार्थ्यांच्या सहलीचा संपूर्ण खर्च सम्यक ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. सहलीला जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून समाधान वाटले. या मुलांनाही शैक्षणिक सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत आहे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*