*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
Respected Sir / Madam,
Press Release
*‘ब्लाइंड गेम’ नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग पुण्यात होणार*
*( गूढ कथेचा थरारक अनुभव देणारं - ‘ब्लाइंड गेम’ नाटक )*
प्रसिद्ध नाट्य लेखक रत्नाकर मतकरी यांच्या गूढ लेखणीचा थराराची अनुभूती देणारे ‘ब्लाइंड गेम’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या ३ मार्च रोजी सायं ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे. कमी कालावधीच या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून उत्तम कथानक, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय व उच्च तांत्रिक मूल्यांमुळे रसिक प्रेक्षकांना या नाटकाने मोहिनी घातली आहे. पुण्यातील आघाडीची नाट्य निर्मिती करणारी ‘रसिक मोहिनी’ संस्थेचे हे ७ वे नाटक असून याच्या अगोदर अनेक चिरंजीव आईस, लेकुरे उदंड जाली, जन्मरहस्य अशा दर्जेदार नाटके या संस्थेने निर्मिती केली आहे. यामुळे निर्माती व अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या प्रयत्नातून विविध विषयांची नाटके रसिकांना पाहायला मिळाली आहेत.
“एका घरात एक फोटोग्राफर आणि त्याची बायको राहतात. त्याच इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर एक शाळकरी मुलगीही रहात असते. एक विलक्षण घटना घडते आणि मग ती मुलगी आणि फोटोग्राफरची बायको आलेल्या रहस्यमय संकटाला कशी मात देतात हे” 'ब्लाईंड गेम ' या नाटकाचं कथानक आहे. दोन तास खुर्चीला खेळवून ठेवणारे नाटक असून रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीच गारुड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक अनिल खोपकर, नेपथ्य श्याम भूतकर, प्रकाश, राहुल जोगळेकर, संगीत, तेजस चव्हाण, रंगभूषा, नरेंद्र वीर सूत्रधार शेखर दाते, नरेंद्र मोहिते, तर कलाकार, भाग्यश्री देसाई, शिवराज वाळवेकर, ऋतुजा जोशी, आशुतोष नेर्लेकर, डॉ. संजीवकुमार पाटील, दीपक रेगे अशा कलाकारांच्या दमदार अभिनयाने हे नाटक सजले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*