*गोविंद गोपाळ यांच्या समाधीस अभिवादन करून लाखोंच्या जनसागराने केले नवीन वर्षाचे स्वागत*
शिक्रापूर : या वर्षी भिमाकोरेगावच्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो भिम अनुयायांनी भेट दिली याच जनसागराने वढू येथील गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीस देखील भेट दिली.संभाजी महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार करणारे गोविंद गोपाळ महार हे आमचे स्फूर्तिस्थान आहेत म्हणून आम्ही येथे दरवर्षी भेट देतो असे अनेक भिम अनुयायी सांगत होते.यावेळी फुलांनी सजविलेले गोविंद गोपाळ यांच्या समाधीचे चित्र डोळ्यात साठवून जात आहोत.पण लवकरच या समाधीस्थळाचा विकास व्हावा अशी अपेक्षा अनेक भिम अनुयायी व्यक्त करत होते.रात्री बारा वाजता बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे व गोविंद गोपाळ यांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या उपस्थितीत पंचशील त्रिसरण घेऊन समधीस अभिवादन करण्यात आले.सकाळी ७ वाजता पुन्हा त्रिसरण पंचिशील घेऊन समाधीस अभिवादन करण्यात आले.यावेळी किरण शिंदे,पांडुरंग गायकवाड,सनी कांबळे,रोहित गायकवाड,शुभम गायकवाड,सुमित गायकवाड,केतन जगताप, विकास ओव्हाळ,संजीत खारवे,शिलरत्न दिपंकर,दादा साळवे उपस्थित होते.दिवसभर समाधीच्या भेटीसाठी येणाऱ्या भीमसैनिकांच्या सेवेसाठी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने स्वयंसेवकांनी स्वयंसेवक म्हणून कार्य केले.संघटनेच्या वतीने भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेच्या हजारो प्रतीचे वाटप भिम अनुयायांना करण्यात आले.या समाधीस भेट देण्यासाठी देशभरातून भीमसैनिक आले होते.दोन वर्षांपूर्वी झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख सुरक्षाव्यवस्था पुरविली होती.जास्त अंतर चालत यावे लागत असल्याने थोडी गैरसोय होत असली तरी पुढच्या वर्षी दुप्पट संख्येने भेट देऊ असे अनेक भीमसैनिक आपली भावना व्यक्त करत होते.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुहास वारके,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील यांनी समाधीस भेट दिली तसेच सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती घेतली.स्थानिकांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.या प्रसंगी राजेंद्र गायकवाड,संदीप गायकवाड,विकास वाघमारे,रुपेश गायकवाड,अमोल पटेकर,शैलेश गायकवाड,आशिष वाघमारे,रोहित गायकवाड,स्वप्नील गायकवाड,रावसाहेब गायकवाड, नितीन गंगावने, विजय गायकवाड, शुभम गायकवाड,महेंद्र गायकवाड,अक्षय जठार,रमेश गायकवाड,सनी कांबळे, सुमित गायकवाड, केतन जगताप,विकास ओव्हाळ,संजीत खारवे,शिलरत्न दिपंकर,दादा साळवे,हर्षवर्धन गंभीरे,सुहास शिंदे,नयन वने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.
गोविंद गोपाळ यांच्या समाधीस अभिवादन करून लाखोंच्या जनसागराने केले नवीन वर्षाचे स्वागत*