निरोगी जीवनासाठी पोषक रहस्य...* म्हणजेचं दररोज सकाळी किमान ७ मिनिटे धावणे!*

*निरोगी जीवनासाठी पोषक रहस्य...*


म्हणजेचं दररोज सकाळी किमान ७ मिनिटे धावणे!*


सर्वांना सांगावेसे वाटते....
*धावाल तरचं (जास्त)  सुखाने ,आनंदाने जगाल!*
धावण्याच्या गुणांनी सगळ जग  परिचित असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे विरळातच मोडतात.
 *दररोज निव्वळ सात मिनिटे धावण्याने (रनिंग) हृदयविकार व पक्षाघाताने जग सोडून जाण्याची शक्यता चक्क ५५ टक्क्य़ांनी कमी होते असे संशोधनातूनचं स्पष्ट झालेले आहे....*
जागतिक आरोग्य संघटनेने आठवडय़ात ७५ मिनिटे धावण्याचा व्यायाम करण्याची शिफारस यापूर्वीच केली असली तरी त्याचे आरोग्यविषयक फायदे काय आहेत हे सिद्ध झाले नव्हते. 


संशोधकांच्या मते त्यांनी १५ वर्षांच्या काळात १८ ते १०० वयोगटातील ५५ हजार १३७ प्रौढांची माहिती घेतली व त्यात त्यांचा जीवनकाल व धावणे यांचा काही संबंध आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला. 


*जे लोक धावण्याचा व्यायाम करीत नाहीत त्यांच्यापेक्षा धावणारे अधिक वर्षे जास्त जगतात असे संशोधनात दिसून आले. 
 
 *सर्वं लोकांना रोज किमान सात मिनिटे धावण्याचा सल्ला देणेही गरजेचे आहे.* 


*जे लोक आठवडय़ाला तासापेक्षा कमी काळ धावतात त्यांनाही जे लोक आठवडय़ाला तीन तास धावतात त्यांच्या सारखाच फायदा मिळतो. जे लोक सलगपणे अनेक वर्षे धावण्याचा व्यायाम करीत होते त्यांना जास्त फायदा झालेला दिसून आला....*
 ५ मिनिटे धावण्याने होणारा फायदा हा १५ मिनिटे चालण्याने मिळणाऱ्या फायद्याइतकाचं असतो. 
*७मिनिटे धावण्याने मिळणारा फायदा७० मिनिटे चालण्याने मिळणाऱ्या फायद्याच्या चौपट असतो.* 


धावण्यासाठी तुम्ही *अ‍ॅथलिट* असायची गरज नाही. पण मनात 
 "जुनून" अन
PASSION (तीव्र इच्छा!)
 असली पाहिजे.....
 म्हणजे 
'कोणतीही गोष्ट ,कोणत्याही वयात अशक्य नसते!'


धावणे किंवा व्यायामासाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे.
 या काळात वातावरण थंड असल्यामुळे अधिक वेळ ऊर्जा टिकून राहते. "यासाठीच मॅरेथॉन ही डिसेंबर जानेवारीतच हिवाळ्यात ठेवतात."
  *धावल्यामुळे शरीराची काम करण्याची क्षमता (स्टॅमिना) वाढते.*
धावण्याचा एक आरोग्याचा फायदा म्हणजे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवणे. हे लक्षात ठेवा की धावणे चालू ठेवण्यासाठी श्वासोच्छवासाची भरपूर क्षमता असणे आवश्यक आहे.


 नियमितपणे धावणे हे दर्शवते की हृदयरोगाचा धोका निम्म्याने कमी होतो. जितक्या वेगवान तुम्ही धाव घ्याल, तुमचे हृदय रक्ताच्या पळाप्रमाणे धावेल. तर तुमचे हृदय दृढ होते.
*धावणे आपले हृदय बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे....*


अशा प्रकारे, आपल्या संपूर्ण शरीरावर ऑक्सिजन आणि रक्ताचे प्रभावी अभिसरण होते. 
नवीन मित्र बनविण्यासाठी: -
मैत्रीपूर्ण स्पर्धेसाठी सुरूवात करण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, 
हे ध्येय साध्य करण्यासाठी धावणें आवश्यक आहे. 
धावण्यामुळे स्नायू तंतू मजबूत होतात
 *धावण्या मुळे, जॉगिंग दरम्यान ओटीपोट, कमरेंच्या सर्व मांसपेशी आणि पाय मधील स्नायू तीव्रतेने सक्रिय होतात...*
धावण्यामुळे हाडे मजबूत होतात
धावण्या च्या परिणामामुळे स्नायू, हाडे आणि सांधे मजबूत होतात.
नियमितपणे धावणे दीर्घकाळ शरीरातील रक्तदाब संतुलित करते, उच्च रक्तदाब कमी करते आणि कोलेस्ट्रॉल संतुलित करते.
 *तथापि, हे पुन्हा उल्लेखनीय आहे. आपण हे सर्व फायदे दीर्घकाळापर्यंत पाहू शकतात.*


आपण मानसिकदृष्ट्या बळकट होतात.
जेव्हा आपण धावता तेव्हा आपल्या अवयवांना आणि आपल्या मेंदूत ऑक्सिजन समृद्ध रक्ताचे प्रमाण वाढते. हे आपल्या मनाची कार्यक्षमता वाढवेल. 


उत्कृष्ट झोपेचा नमुना तयार होतो.
विशेषत: डॉक्टर आपल्याला संध्याकाळी झोपायच्या आधी हलके अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.


वजन कमी होणे
बरेच लोक वजन कमी करण्याच्या उद्देशाने धावण्यास सुरवात करतात. खरं तर, कॅलरी जळण्याचा आणि जास्त वजन कमी करण्याचा एक धावणे हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 
आपल्याला फक्त आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा जास्त कॅलरी जाळण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. वजन कमी करण्याचा हा सुवर्ण नियम आहे. 
जास्त काळ जगणे: -
*नियमितपणे धावण्यामुळे आयुष्यमान वाढते असे ठोस पुरावे आहेत, जरी याचा अर्थ नेहमीच चांगला असला तरीही - दिवसातील काही मिनिटेदेखील, कॅलरी बर्न करण्याचा,  वजन कमी करण्याचा उद्देश धावण्यामुळे शक्य होतो.
धावणे हा प्रकार शरीरातील चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करतो. 
ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात.
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी धावणे आवश्यक आहे....


*म्हणजेचं दररोज  किमान ७ मिनिटे धावणे, अन  ७ सूर्यनमस्कार घालणे म्हणजे किमान ७०वर्षे विना गोळ्या औषध सर्वोत्तम जगणे होय!*


    🙏🕉🙏
🏆क्रीडाभारती🏆