प्रेस नोट
*एम.सी.ई. सोसायटी च्या मराठी अॅकॅडेमी तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा*
पुणे:
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अॅकॅडेमी तर्फे दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२० दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन युवक क्रांती दल संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते होणार आहे.
आझम कॅम्पस च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरुवार, दि. २ जानेवारी २०२० ,सकाळी ११.३० वाजता उद्धाटन होणार आहे.डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असणार आहेत.
राज्य शासनाच्यां मराठी भाषा विभागाच्या उपसचिव श्रीमती अपर्णा अ. गावडे याही उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
काव्यवाचन स्पर्धा,निबंध स्पर्धा,कार्यशाळा, चिकणमाती स्पर्धा,रेखाचित्र स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन
क्षेत्रभेट ,प्रश्नमंजुषा स्पर्धा ,नामवंतांच्या प्रकट मुलाखत,वक्तृत्व स्पर्धा
पथनाट्य स्पर्धा, लेखक तुमच्या भेटीला, आनंद मेळावा असे अनेक उपक्रम या पंधरवडयात आयोजित करण्यात येत आहेत.
नुरजहाँ शेख,संचालिका, स्पोकन मराठी अॅकॅडेमी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
.............................................