अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या वतीने आयोजित हळदी - कुंकू कार्यक्रम

*प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या वतीने आयोजित हळदी - कुंकू कार्यक्रम कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे पार पडला.*


यावेळी लोकमत कुपन स्पर्धा २०१९ च्या विजेत्यांना सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व लोकमतच्या वतीने आयोजित 'तुझ्यात जीव रंगला'  या बहारदार लावणी कार्यक्रमाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले. 


यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, जी.प. सदस्या सोनालीताई साबळे, सोनालीताई रोहमारे, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई गंगूले, माधवीताई वाकचौरे,  ऐश्वर्याताई सातभाई, सपनाताई मोरे, उमाताई वहाडणे, स्वप्नजाताई वाबळे, मीनलताई खांबेकर, संगीताताई विसपुते, मनीषाताई विसपुते,  रमाताई पहाडे, मायदेवी खरे, सीमाताई पानगव्हाणे, नेत्राताई कुलकर्णी, वर्षाताई गवारे, आशाताई गंगवाल, पूनमताई विसपुते, सुनीताताई खैरनार, तसेच कोपरगाव शहरातील विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.