लक्षवेध दिनानिमित्त राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द*

*लक्षवेध दिनानिमित्त राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द*


 ◆ *कर्मचाऱ्यांच्या संपाला महासंघाचा पाठिंबा*


      पुणे, दिनांक ८:- राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रलंबित मागण्‍या पूर्ण करण्याबाबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचे निवेदन आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 


     महासंघाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व  कर्मचारी संपाला पाठिंबा देण्यासाठी आज महासंघाच्या वतीने राज्यभर ‘लक्षवेध दिन’ पाळण्यात आला.
      यानिमित्त महासंघाच्या मागण्यांचे निवेदन जिल्‍हाधिकारी श्री. राम यांना  देण्यात आले. यावेळी महासंघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. जयश्री कटारे, राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, राज्य संघटक अशोक मोहिते, राज्य सहचिटणीस सविता नलावडे, निता शिंदे-सावंत, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, कोषाध्यक्ष मोहन साळवी, माणिकराव शेळके, डॉ.धर्माधिकारी, आर.आर. इंदुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


  महाराष्‍ट्रातील विविध खात्यातील ७० राजपत्रित अधिकारी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करणे, सर्व रिक्त पदे तत्परतेने भरणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, बक्षी समितीचा वेतनत्रुटी ( खंड-२) अहवालाची अंमलबजावणी करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० रुपयांची ग्रेड पे ची मर्यादा काढणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्ष बालसंगोपन रजा मिळणे तसेच विभागवार चक्राकार बदली पद्धतीतून महिला अधिकाऱ्यांना वगळणे, सातव्या वेतन आयोगाच्या पगारावर केंद्राप्रमाणे वाहतूक व इतर भत्ते देणे, कर्मचारी- अधिका-यांना होणा-या  मारहाण, दमबाजीबाबत कठोर भूमिका घेणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
 
          000000000


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏