आज पत्रकारदिनी जाणून घेऊ संपादक व पत्रकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली "वृत्तपत्रे"*

💁‍♂ *आज पत्रकारदिनी जाणून घेऊ संपादक व पत्रकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली "वृत्तपत्रे"*


*JayBhim Today | Special*


📰 *मूकनायक*


मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले.


📰 *बहिष्कृत भारत*


बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. 


📰 *समता*


समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे (समता सैनिक दलाचे) मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती.


📰 *जनता*


जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.


📰 *प्रबुद्ध भारत*


प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.


👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी इथली लोकभाषा आहे. 


😇 सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजु शकत होती. 


🙄 याउलट महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.