रहस्य’ चित्रपटात आदिवासी गीतनृत्याचा अनोखा अविष्कार

रहस्य’ चित्रपटात आदिवासी गीतनृत्याचा अनोखा अविष्कार


चित्रपटाच्या कथेला किंवा प्रसंगाला अनुसरून एखादं हटके गाणं चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित करते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांची, प्रांतांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. काही चित्रपटांतील गाण्यातून त्या परंपरेचे दर्शन घडत असते. आगामी ‘रहस्य’ या चित्रपटातून खानदेशातील आदिवासी गीतनृत्याचा आस्वाद घेता येणार आहे. हे गीत खानदेशातील विभागातील आदिवासी लोक होळीचा सण नृत्य करीत कसा साजरा करतात यावर आधारीत आहे. आफ्रिकन बीट्सशी साधर्म्य असलेल्या या आदिवासी गाण्यातून संगीत व निसर्ग यांच्या सुरेख नातेसंबंधाच दर्शन प्रेक्षकांना होईल. सातपुड्याच्या नयनरम्य परिसरात चित्रीत झालेलं हे गाणं वेगळा अनुभव  असल्याचे सांगत प्रेक्षकांसाठी ही अनोखी मेजवानी असेल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील व्यक्त करतात.


रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं रहस्य हा या चित्रपटाचा गाभा आहे. ७ फेब्रुवारीला रहस्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लकी बडगुजरस्वाती पाटीलऋतुजा सोनारस्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे. चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकरतर संकलन भावेश पाटील यांचे आहे. गायक सुनिधी चौहानआदर्श शिंदेप्रेम कोतवालयामिनी चव्हाण या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. पार्श्वसंगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित व मंदार पंडित यांचे आहे. डॉ. माधुरी वडाळकरदिनेश पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून गिरीश सूर्यवंशी कार्यकारी निर्माते आहेत. ऋतूध्वज देशपांडे यांनी चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. निर्मिती व्यवस्थापक विजय माळी आहेत. डॉ. अजय फुटाणे या चित्रपटाचे वितरक आहेत