कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत विद्यार्थ्यंसाठी स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत.

कर्जत ,दि.  12 गणेश पवार


                कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत विद्यार्थ्यंसाठी स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून विद्यार्थ्यंसाठी हँडवॉशसेंटर उघडण्यात आले आहे.जिल्हा परिषद शाळेत असे हँडवॉश सेन्टर असलेली नेरळ ची कन्या शाळा पहिली शाळा ठरली असून या शाळेचे आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करायला हवे असे मत कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांनी मांडले . 

              नेरळ येथे असलेलया रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत उभारण्यात आलेल्या हँडवॉश सेन्टर चे उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थी आपल्या दुपारच्या सुट्टीमध्ये सोबत आणलेला आणि शाळेतील पोषण आहार खाण्यास घेतात. त्यावेळी शाळेने लावलेल्या शिस्तीप्रमाणे विद्यार्थी नळाखाली हात धुवून येत असतात. पण नेरळ येथील कन्या शाळेने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या निर्माण होऊ नये यासाठी चक्क हँडवॉश उपलब्ध करून दिले आहे. हे हँडवॉश चक्क तेथील नळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्या हँडवॉश केंद्राचे उदघाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मानावे आणि नेरळ ग्रामपन्चायतचे सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरळ कन्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष नाईक हे होते.  त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर थोरवे यांनी या हँडवॉश सेन्टर बाबत आपली  देत विद्यार्ट्ठ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी असे सेन्टर कसे महत्वाचे आहेत याबाबत आपली भूमिका प्रास्ताविक करताना स्पष्ट केली.   

                      त्यावेळी नेरळ ग्रामपन्चायत चे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ मध्ये अशा प्रकारे वेगळे उपक्रम राबविणारी शाळा आहे याचा आम्हाला अभिमान असून नेरळ ग्रामपन्चायत शाळांना कोणत्याही अडचणी आल्यास आणि मदत मागितल्यास ती मदत आम्ही देण्यास तयार असू असे स्पष्ट आश्वासन दिले. तर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छता देखील प्राधान्याने पाहिली पाहिजे असे आवाहन तालुक्याच्या सभापती सुजाता मनवे यांनी केले.