नितीन राऊत, गजानन किर्तीकर, जितेंद्र आव्हाड यांना जाधवर युवा संसदेचे पुरस्कार-

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-
नितीन राऊत, गजानन किर्तीकर, जितेंद्र आव्हाड यांना जाधवर युवा संसदेचे पुरस्कार-
खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार संसदेचे उद््घाटन ;
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत समारोप


पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये पाचव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे बुधवार, दिनांक २९ व गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. संसदेचे उद््घाटन २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर उपस्थित होते. 


उद््घाटन सोहळ्यादरम्यान हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत, खासदार गजानन किर्तीकर, डॉ.श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, युवा रमणप्रीत आदर्श उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप असणार आहे. 


बुधवारी (दि.२९) दुपारी ३ वाजता भारतीय पत्रकारिता - किती लोकाभिमुख, किती पक्षाभिमुख याविषयावर ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे, विजय चोरमारे, महेश म्हात्रे, मानखेडकर आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. 


गुरुवारी (दि.३०) सकाळी १० वाजता भारत महासत्ता बनण्याचे प्रवेशद्वार : धर्म, शिक्षण की राजकारण? याविषयावर युवा उद्योजक अनिकेत टिळे, प्रमोद चंचुवार, शिवव्याख्याते प्रा.श्रीमंत कोकाटे हे तरुणाईशी संवाद साधतील. तर, दुपारी १२ वाजता सक्षम युवा, समर्थ भारत याविषयावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील, पत्रकार प्रशांत देशमुख, रविकांत तुपकर, शिवव्याख्याते प्रा.अमोल मिटकरी, प्रविण निकम आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.  


* चंद्रकांत पाटील, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत समारोप


संसदेचा समारोप दुपारी ३ वाजता होणार असून यावेळी ग्राम सभा ते लोकसभा याविषयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, राज्यमंत्री आदिती तटकरे हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार रवि पाटील तमनगौंडा, आदर्श सरपंच पुरस्कार कविता घोडके पाटील यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील, धैर्यशील माने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, देवेंद्र भोयार, राम सातपुते, राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


नेहरु युवा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कॉमनवेल्थ युथ कौंिन्सल, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकायार्ने ही संसद होत आहे. संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदा संसदेच्या कार्यकारणीचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथ खडसे हे आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, राहुल कराड, रविंद्र्र आंबेकर, प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर हे देखील संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई यांसह मराठवाडा या भागांतून २००० हून अधिक विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत. संसदेकरीता विनामूल्य प्रवेश असून तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.