सुबोध झाला ‘भयभीत’

सुबोध झाला 'भयभीत'


भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. अभिनेता सुबोध भावेला सध्या कोणत्या तरी भयाची चाहूल लागली असून या अनामिक भीतीमुळे तो भयभीत झाला आहे. ही भीती नेमकी कसली आहे ? हे जाणून घ्यायचं असेल तर आगामी २८ फेब्रुवारीला ते जाणून घेता येईल. 'भयभीत' हा सुबोधचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या या पोस्टरवर सुबोध भावेचा भयभीत झालेला लुक पहायला मिळतोय. अभय सिन्हा, 'अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स' आणि 'ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि' यांची  प्रस्तुती असलेल्या 'भयभीत' चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे. सुबोध भावे यांच्यासोबत पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंत असणार आहेत.


अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत. 


२०२० या नवीन वर्षाची सुरुवात सुबोध भावे साठी 'भयभीत' चित्रपटाने होणार आहे. आजवर भयपट साकारण्याची संधी क्वचित मिळाल्याने 'भयभीतसाठी सुबोध खूपच उत्सुक आहे.


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान