पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलातर्फे *दल दिन* साजरा करण्यात आला.

शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलातर्फे *दल दिन* साजरा करण्यात आला. दलदिनाची सुरवात सकाळी ११ वाजता झेंडावंदनाने झाली. प्रमुख पाहुणे मा. श्री. जगदीश जेधे ( खजिनदार, श्री शिवाजी मराठा सोसायटी) यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर डॉ. ना. सु. हर्डीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 


या प्रसंगी खेळाच्या विविध स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धांमध्ये ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये डॉज बॉल, लंगडी, व्हॉलीबॉल, धावणे इत्यादी खेळ प्रकार घेण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. 


दल दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादलाचे जॉईंट सेक्रेटरी श्री. संग्राम जी तावडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्री. संजय बालगुडे, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी श्री. राजेंद्र जगताप, खजिनदार श्री. जगदीश जेधे, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष श्री. प्रकाश पवार व सेवादलाचे सर्व ताई व भाई उपस्थित होते. यामध्ये श्री. अर्जुन लोणंदकर सर, श्री. प्रभाकर कौंडा, श्री. वाणी सर, श्री. परेश गायकवाड, महीला अध्यक्ष स्नेहलता ताई पवार, अतिरिक्त महिला अध्यक्ष विजया ताई क्षीरसागर, रंजना ताई रजपूत, मंगला ताई संसारे, वीणा ताई कदम, सुनिता ताई शिंगे इत्यादी उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता झेंड्याला वंदन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.