पुणे औंध शाखेचे उदघाटन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्री ए. एस. राजीव यांच्या हस्ते संपन्न

प्रसिद्धीसाठी                                                                                                       


पुणे औंध शाखेचे उदघाटन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्री ए. एस. राजीव यांच्या हस्ते संपन्न


(फोटोमध्ये:बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव, डावीकडे पुणे अंचल कार्यालयाचे प्रमुख श्री पी. आर. खटावकर आणि उजवीकडे अलका रानवडे) 


पुणे 01 जानेवारी, 2020: यावर्षी बँकेच्या खातेदारांना आमची उत्तम ग्राहक सेवा आणि उत्पादनांमध्ये केलेले सुधारित बदल तसेच शाखेमध्ये आणि शाखा परिसरामध्ये ठेवण्यात आलेली स्वच्छता अनुभवयास मिळेल असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव यांनी केले.  पुणे औंध शाखेच्या नव्या स्थलांतरित वास्तुचे उदघाटन श्री राजीव यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. नव्या वर्षाच्या शुभेच्छा ग्राहकांना देऊन ते पुढे म्हणाले की, शाखांच्या सौंदर्यीकरणाबरोबरच नव्या आणि सोईच्या ठिकाणी जुन्या शाखांचे स्थलांतर करण्यावरही बँक विशेष लक्ष देत आहे. औंध शाखेची नवी जागा पूर्वीच्या जागेच्या शेजारीच आहे. या कार्यक्रमावेळी पुणे अंचल कार्यालयाचे प्रमुख श्री पी. आर. खटावकर आणि शाखाप्रमुख श्रीमती अलका रानवडे उपस्थित होते.


पुणे अंचल कार्यालयाचे प्रमुख श्री पी. आर. खटावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, औंध शाखा ही एटीएम, पासबुक प्रिंटिंग मशीन आणि लॉकर सुविधा असलेली परिपूर्ण शाखा असून शाखाप्रमुख श्रीमती अलका रानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली औंध शाखा उत्तम ग्राहक सेवा देवून व्यवसायाचे सर्व लक्ष पूर्ण करेल.