नवोदित दिग्दर्शकांसाठी आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव महत्त्वाचे-देवेंद्र जाधव
* पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट माहितीपट महोत्सवात अमेरीकेचा आय अॅम गॉना टेल गॉड एव्हरीथिंग सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट,महाचिल्लल (तमिळ) सर्वोत्कृष्ट लघुपट व गर्ल्स आर नॉट ब्राइड(बंगाल) सर्वोत्कृष्ट माहितीपट. *
* पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट माहितीपट महोत्सवाचा समारोप उत्साहात *
पुणे ः नवोदित दिग्दर्शकांसाठी आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव गरजेचे आहेत. लघुपट व माहितीपट बनविण्यासाठी कमीत कमी वेळेत प्रभावीपणे विषय मांडता येतो असे मत विविध आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या अॅन्ड गांधी गोज मिसिंग लघुपटाचे दिग्दर्शक, थँक्यू विठ्ठला या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व ज्युरी देवेंद्र जाधव यांनी पहिल्या फिल्मफ्रेमआंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. अष्टविनायक मोशन फिल्मस व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय पहिल्या फिल्म फ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सभागृहात संपन्न झाला.
या पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट माहितीपट महोत्सवात अमेरीकेचा आय अॅम गॉना टेल गॉड एव्हरीथिंग सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट, महाचिल्लल (तमिळ) सर्वोत्कृष्ट लघुपट व गर्ल्स आर नॉट ब्राइड(बंगाल)सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला.
याप्रसंगी म्होरक्या चित्रपटांचे दिग्दर्शक अमर देवकर विविध चित्रपटांचे
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर (कॅमेरामन) मयुरेश जोशी, प्रसिद्ध अभिनेते सचिन गवळी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट, मिडीया अॅन्ड फाइन आर्टच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा पाराशर, महोत्सवाचे संयोजक व संचालक योगेश शर्मा, आरुष फायर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राहुल जाधव, जीटी पेस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गायकवाड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मिडिया अॅन्ड फाइन आर्टसचे संचालक मकरंद माळवे, महोत्सवाचेप्रसिद्धीप्रमुख प्रशांत निकम, महोत्सवाचे समन्वयक श्रीपाद जोशी, श्रावि मीडिया अँड प्रोडूकशनचे विवेककुमार तायडे ,हर्षल वाघमारे यांच्यासह फिल्ममेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना देवेंद्र जाधव म्हणाले की, दोन-तीन तासांच्या चित्रपटापेक्षा लघुपट व माहितीपट बरेच काही सांगून जातात. असे महोत्सवपाहण्यामुळे आयुष्यात बदल घडण्यास सुरुवात होते. तसेच दिग्दर्शक व तंत्रज्ञांशीही या फेस्टीव्हलमधून सुसंवाद साधता येतो. उमेश कुलकर्णीयांचा गिरणी लघुपट, नागराज मंजुळे यांचा पिस्तुल्या लघुपट व विविध प्रसिद्ध दिग्दर्शक व मीही अशा प्रकारच्या महोत्सवातून घडली आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी व होतकरू लघुपट-माहितीपट दिग्दर्शकांनीअसे महोत्सव आवर्जुन पाहिले पाहिजे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतअशा प्रकारच्या लघुपट माहितीपट महोत्सवासाठी पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब आहे. माझ्या अॅन्ड गांधी गोज मिसिंग व आणि गांधी हरवले गेले यालघुपटांना 10 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
आपल्या भाषणात अमर देवकर म्हणाले की, स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. लघुपट व माहितीपट बनविणे हे आव्हानात्मक असते.
आपल्या भाषणात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लिबरलआर्टस, मिडीया अॅन्ड फाइन आर्टसच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा पाराशरम्हणाल्या की, ‘या आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवातील फिल्म्स या सामाजिक संदेश देणार्या होत्या. अशा प्रकारच्या महोत्सवामुळे
निर्माते दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञान प्रोत्साहन मिळते. फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवामुळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन
असे महोत्सव आगामी काळात घेतले जावेत.’
आपल्या भाषणात राहुल जाधव म्हणाले की, फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवामुळे फिल्ममेकर्सला एक मंच मिळाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवातूनच चांगले निर्माते व दिग्दर्शक घडतील.
आपल्या भाषणात राजेंद्र गायकवाड म्हणाले कही, ऐतिहासिक घटनांचं चित्रपट माध्यमाद्वारे येणार्या नवीन पिढीला मागर्दशन मिळते. त्यामुळे लघुपट व माहितीपट हे जगाला एक सामाजिक संदेश देतात.
या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवातील निकाल
पुढीलप्रमाणे - लघुपट प्रथम- महाचिल्लल (मल्ल्याळम), द्वितीय- बघीरा (हिंदी), तृतीय-फ्रेशनर्स व पुलंजी (विभागून) स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड लघुपट- गाठ (मराठी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आथित्य कानगर्जन (ड्रिम्स)
स्पेशल ज्युरी अवार्ड दिग्दर्शक जयेश आपटे (दगड), सर्वोत्कृष्ट अभिनेता- सुमित राघवन (स्टॉबेरी शेक), मिलिंद शिंदे (फ्रेशनर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- हृता दुगुले (स्ट्रॉबेरी शेक), रुना चौधरी (लीला), माहितीपट-
प्रथम-गर्ल्स आर नॉट ब्राइड- रुना चौधरी (बंगाली), द्वितीय- लिविंग ऑन द एज (हिंदी),स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड माहितीपट लक्ष्यू मी-अक्षय कदम (मराठी) व द लाइफ सेव्हर (मराठी) विभागून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बाबुराज असार्या (द अनसंग हिरोज) आंतरराष्ट्रीय लघुपट प्रथम- आय गॉना टेल गॉड एव्हरीथिंग (अमेरीका), द्वितीय- रीकॉनजीनेशन (यु.ए.ई.), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - टाटीयाना फेडॉरेस्कॉइया (फेथ) रशिया.
या महोत्सवामध्ये भारतातील तमिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ,गुजरात, जम्मू कशमीर, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब,हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यातील लघुपट व मािहतीपट सहभागी झाले होते. त्याचबरोबर जगभरातील नेदरलॅंड, बेल्जीयम,इराण, अमेरिका,ब्रटन, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना , पोलंड, स्पेन, पोर्तुगाल,क्युबा, इटली, आइसलँड, सिंगापूर, नॉर्वे, साऊथ कोरिया, श्रीलंका, साऊथ आफ्रिका ,तुर्की, व्हिएतनाम, इस्त्रायल, केनिया, पेरू, चीन, जपान, रशिया, इजिप्त, ग्रीक, स्वित्झर्लंड, कोलंबिया , हंगेरी, बांग्लादेश, ऑस्ट्रिया आदी 65 पेक्षा जास्त देशातील लघुपट व माहितीपट सहभागी झाले आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात(लघुपट व माहितीपट) 350 लघुपट व माहितीपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी152 लघुपट व माहितीपट महोत्सवाच्या स्पर्धेच्या स्क्रीनिंगसाठी निवड करण्यात आली होती.
विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिजीत कोरडे व प्रशांत निकम यांनी केले तर आभार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मिडिया अॅन्ड फाइन आर्टसचे संचालक मकरंद माळवे यांनी मानले.