राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोप अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत पार पडला.*

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व के.जे.सोमैय्या वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अंजनापूर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोप अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत पार पडला.*


यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक श्री. दिपक शास्त्री, प्राचार्या सौ. विजया गुरसळ, अंजनापूरच्या सरपंच कांताबाई गव्हाणे, बापुसाहेब गव्हाणे, पर्वत गव्हाणे, चंद्रभान गव्हाणे, जगन्नाथ गव्हाणे, भास्कर गव्हाणे, ग्रामपंचायतचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.