कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे असलेल्या बुद्ध कालीन लेणी पाहण्यासाठी आलेले चार तरुण रस्ता भरकटले होते. त्यांना शोधण्यात यश आले असून ते सर्व तरुण रात्री कर्जत रेल्वे स्थानकात पोहचले असून ते आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत.
मुंबई येथून पराह जवनदाल हा आपल्या अन्य तीन मित्रांसह ४ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील कोंढ़ाने लेणी येथे आला होता. ते परतीच्या प्रवासात वाट चुकले आणि त्या रस्त्यात वाढलेल्या गवतामुळे रस्ता भरकटले. त्याबाबत रायगड पोलिसांना माहिती मिळताच आपद्ग्रस्त टीम ला पाचारण करण्यात आले. त्या टीमचे सदस्य तसेच शिवदुर्ग पथकाचे गिर्यरोहक आणि कोंढ़ाने लेणीच्या पायथ्याशी असलेल्या कोंदिवडे गावातील ग्रामस्थ यांनी सायंकाळी शोधाशोध सुरु केली.लोणावळा ये शिवदुर्ग मित्र मंडळाचे तरुण कोंढणे लेणी येथे पोहचले,त्याचवेळी कोंदिवडे गावातील स्थानिक रहिवाशी कोंडू आत्माराम घारे यांनी आपल्या सोबत असलेल्या आपल्या गावातील तरुणांचे मदतीने रस्ता भरकटलेल्या त्या चार तरुणांना परिसरात अंधार दाटण्यास सुरुवात झाली असता शोधून काढले. त्यावेळी या सर्व मदत पथकाला खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीरंग कसवे आणि लोणावळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक काळे यांनीमदतीला गेलेल्या सर्वांशी संपर्क सुरु ठेवला होता.ते
े सर्व ट्रेकर्स सात च्या दरम्यान सापडल्यानंतर त्यांना कोंदिवडे येथे आत्माराम घारे आणि त्यांच्या गावातील तरुणांनी गावात आणले. तेथे त्या सर्वांना खायला देऊन त्यांच्यासाठी कर्जत स्टेशन कडे जाण्यासाठी रिक्षा करून दिली. साधारण साडे आठ वाजता ते चारही तरुण कर्जत स्थानकात पोहचले.त्यांनांतर कर्जत स्थानकातून त्यांनी मुंबई कडे जाणारी उपनगरीय लोकल पकडून आपला पुढील प्रवास सुरु केला.