कामास प्राधान्य आणि आयुक्तांचे आगळे-वेगळे स्वागत...- अश्र्विनी नितीन कदम (नगरसेविका)*

*कामास प्राधान्य आणि आयुक्तांचे आगळे-वेगळे स्वागत...- अश्र्विनी नितीन कदम (नगरसेविका)*


आदरणीय अजितदादा नेहमीच सांगतात आपण जनतेची कामे करण्याकरिता जनतेचे सेवक झालेले आहोत. त्यामुळे मला व माझे पती नितीन कदम यांना, सतत कार्यरत राहणे आवडते. आदरणीय अजितदादा, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आत्तापर्यंत काम करीत आलेलो आहोतच. परंतु आजची बाब माझ्यासाठी विशेष आहे. आज पुणे महानगरपालिकेचे नवीन "आयुक्त श्री शेखर गायकवाड साहेब" पुणे महानगरपालिकेत रुजू झाले. अर्थातच नवीन आयुक्त असल्याने सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, परंतु मी पुणे शहराच्या विकास कामांचे पत्र आयुक्त साहेबांना देऊन, त्यांचे पुणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल सहर्ष स्वागत केले. माननीय आयुक्त साहेबांनी देखील अगदी हसतच, माझ्या कामाचे स्वागत करून, माझे पत्र स्वीकारले.


आज मला कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि खात्रीने असे वाटत आहे. की निश्चितपणे पुणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त श्रीयुत शेखर जी गायकवाड साहेब, निश्चितपणे आपल्यावरती ओढवलेल्या पूरस्थिती सारख्या नैसर्गिक संकटाला न्याय देतील आणि पुणे शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहतील .माननीय आयुक्त शेखर जी गायकवाड साहेब,पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी, आपली नियुक्ती झाली. एक पुणेकर नागरिक म्हणून व पुणे शहराची नगरसेविका म्हणून आपले याठिकाणी *पर्वती विधानसभा व माझ्या प्रभाग क्रमांक ३५ (सहकारनगर-पद्मावती)* च्या वतीने मी आपले 💐अभिनंदन करते व 😊सहर्ष स्वागत करते. धन्यवाद🙏


-सौ. अश्र्विनी नितीन कदम
(नगरसेविका व मा. अध्यक्षा-स्थायी समिती, पुणे मनपा)