प्रेस नोट
*भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या वतीने*
*२५,२६ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव*
पुणे :
लेखक शाम हरी चक्रा यांच्या सहयोगाने भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत दिनांक २५ व २६ जानेवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी ११ ते १ आणि साडेपाच ते साडेआठ यावेळेत तसेच २६ जानेवारी रोजी ११ ते १ आणि साडेचार ते साडे आठ यावेळेत हा महोत्सव होणार आहे.
भरतनाट्यम,कथक,ओडिसी,सत्तरिया,कुचीपुडी हे शास्त्रीय तसेच संबळपुरी,राजस्थानी हे लोक नृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले जाणार आहेत, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे व तसेच महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी दिली.
या महोत्सवात शरदिनी गोळे,प्रभाताई मराठे,माणिकताई अंबिके यांचा नृत्यक्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. उदयपुर,पुणे ,बंगळूरू,मुंबई,शिलॉंग,जबलपूर,सिंगापूर येथून नृत्यकलाकार सहभागी होणार आहेत.दिव्यांग,विशेष विद्यार्थी देखील नृत्य सादर करणार आहेत.
.हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.भारतीय विद्या भवन च्या सेनापती बापट रस्त्यावरील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात तो होणार आहे.
----------------------