राष्ट्रीय युवा दिनानिमित्त  चिंचवडला  विवेकानंद  युवा मॅरेथॉनचे आयोजन विवेकानंद  केंद्र, कन्याकुमारी चिंचवड शाखा  व 'यशस्वी' संस्थेचा संयुक्त उपक्रम

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त  चिंचवडला  विवेकानंद  युवा मॅरेथॉनचे आयोजन


विवेकानंद  केंद्र, कन्याकुमारी चिंचवड शाखा  व 'यशस्वी' संस्थेचा संयुक्त उपक्रम


पिंपरी  : दिनांक  १० जानेवारी  २०२० :  स्वामी विवेकानंद  जयंती  निमित्त  येत्या १२ जानेवारी  रोजी रविवारी साजऱ्या  होत असलेल्या  राष्ट्रीय  युवा दिनानिमित्त चिंचवड येथे  विवेकानंद  केंद्र, कन्याकुमारी  चिंचवड शाखा  व 'यशस्वी' संस्थेच्यावतीने 'विवेकानंद  युवा मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात  आले आहे. 


१२ जानेवारी रोजी सकाळी  साडे सहा ते साडे सात  या कालावधीत  होत असलेल्या  या मॅरेथॉनची सुरुवात  एल्प्रो चौकातील 'यशस्वी' संस्थेच्या  इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या प्रांगणापासून होईल, तर मॅरेथॉनचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस चे प्रांगण, एल्प्रो चौक, दर्शन हॉल, मोरया हॉस्पिटल, चाफेकर चौक, एल्प्रो चौक व पुन्हा मॅरेथॉनचा समारोप  यशस्वी संस्थेच्या आयआयएमएसच्या प्रांगणात होईल. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांच्या   विचारांचा प्रसार करण्यासाठी या युवा मॅरेथॉनचे आयोजन  करण्यात  आले असून  अधिकाधिक  युवक -युवतींनी  सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात  आले आहे. सहभागासाठी पवन शर्मा  यांच्याशी   ७३५००१४५२६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.