निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात मंगळवारी पतियाळा न्यायालयात सुनावणी झाली.न्यायालयाने आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला असून सर्व आरोपींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे.
सुनावणीदरम्यान पतियाळा न्यायालयातील न्यायाधीशांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चारही दोषींसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू असताना दोषींच्यासमोरच न्यायालयाने आपला निर्णय दिला.
दोषींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये तू-तू-मे-मे देखील झाली. वकिलांच्या या वादात न्यायाधीशांना उडी घ्यावी लागली आणि त्यांनी न्यायलयात शांतता राखण्याचे आवाहन केले. सुनावणी सुरू असताना निर्भयाची आई आणि दोषी मुकेशची आई देखील न्यायालयात उपस्थित होती. सुनावणीदरम्यान दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला.
ANI
✔
@ANI
· 2h
2012 Delhi gang-rape case: Prosecutor urges the court to issue death warrants to convicts. Court informed by the lawyers of convicts that they are in the process of filing curative plea https://twitter.com/ANI/status/1214466071387729920 …
ANI
✔
@ANI
A Delhi court to hear shortly the plea of parents of 2012 Delhi gang-rape victim seeking to expedite the procedure to hang all 4 convicted in the case and also seeking issuance of death warrant against them.
ANI
✔
@ANI
A Delhi court to pronounce order at 3.30pm today on the plea of parents of 2012 Delhi gang-rape victim seeking to expedite the procedure to hang all 4 convicted in the case and also seeking issuance of death warrant against them.
104
2:59 PM - Jan 7, 2020
Twitter Ads info and privacy
21 people are talking about this
राजधानी दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयाने चारही दोषी अक्षय, मुकेश, विनय आणि पवन यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी पतियाळा न्यायालयात चारही दोषींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात सुनावणी झाली.