पाथरी तालुक्यात शेकोटीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

पाथरी तालुक्यात शेकोटीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
__________________________________


थंडी पासून बचाव करण्यासाठी व शरीराला ऊब मिळावी म्हणुन नागरिकांकडून शेकोटीचा आधार घेतला जातोय. पण याच शेकोटीने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील महिलेचा घात केला. वैजंताबाई रंगनाथ घुंबरे असेआगीत होरपळून मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय ६० ) ह्या बुधवार दि ०१ जानेवारी रोजी घरातील पेटवलेल्या चुलीसमोर उब मिळावी म्हणुन बसल्या होत्या, यावेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. याचवेळी घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐकून गल्लीतील काहींनी त्यांना मदत करे पर्यंत त्यांना आगीने कवेत घेतले. यात त्या गंभीररित्या जखमीहोऊन ७४ टक्केपर्यंत भाजल्या गेल्या. गावातील शासकीय रुग्णवाहिकेद्वारे त्यांना परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ,उपचारा दरम्यान गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांचा मृत्यु झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.