दर वर्षीप्रमाणे व य़ंदाही १ जानेवारी हा दिवस 'फुले दाम्पत्य सन्मान दिन' म्हणून साजरा करण्यात आला.

*|| आज १ जानेवारी २०२०, 'फुले दाम्पत्य सन्मान दिन' उत्साहात साजरा...||*


क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरु केलेली शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतीपथावर नेत आहे.


यानिमित्ताने दर वर्षीप्रमाणे व य़ंदाही १ जानेवारी हा दिवस 'फुले दाम्पत्य सन्मान दिन' म्हणून साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त माजी आमदार कमलनानी ढोले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा फुले उत्सव समितीर्फे 'भिडेवाडा ते फुलेवाडा' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज या सन्मान रॅली मध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी मी मोठ्या आनंदाने सहभागी झाले.


*त्याप्रमाणे "शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे आणि स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणेही तितकेच गरजेचे आहे." या फुले दाम्पत्यांच्या प्रेरक विचारांचा वारसा आम्ही नक्की पुढे घेऊन जाणार.*


-अश्विनी नितीन कदम
(नगरसेविका व माजी अध्यक्षा-स्थायी समिती, मनपा, पुणे)