शिवसेना चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरण मा.गुलाबरव पाटील यांच्या हस्ते संपन्न.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व स्व.राहुल पारखे यांच्या स्मरणार्थ वर्तक बाग येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सुमारे ३००० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे पुरस्कार वितरण राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.गुलाबराव पाटील यांनी केले.या प्रसंगी आयोजक रवींद्र भिंताडे,नगरसेवक विशाल धनवडे,निरंजन दाभेकर,संदीप पाटील,उमेश गलिंदे,अमित सावंत,आदि मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप पाटील यांनी केले.  


छायाचित्र :पुरस्कार वितरण करताना गुलाबराव पाटील,रविंद्रभाऊ भिंताडे,निरंजन दाभेकर व अन्य