शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या.

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात. ते उंचीने आणी ताकदीने मराठ्यांपेक्षा जास्त आहेत. तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांची शारिरीक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मोगलांपुढे हार खावी लागत असे. महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले. ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे. मग त्यावर संशोधन चालू केले. यावर सर्व बाजुंनी म्हणजे शस्त्राचा धातु, लांबी, रूंदी, वजन, धार या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली. पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची. ती महाराजांनी मुठ बंद करून घेतली. एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावलं. त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब केली. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शञुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकता येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे ही तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये, पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहेत .*जय जिजाऊ*
       *जय शिवराय*
             *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏