मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड पंचशील चौकात NPR-NRC-CAA विरोधी जाहीर सभेचे आयोजन

मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड NPR-NRC-CAA विरोधी कृती समितीच्या वतीने आज 18 जानेवारी 2020 रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड पंचशील चौकात NPR-NRC-CAA विरोधी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यार्थी नेता फहाद अहमद व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री स्वरा भास्कर ,लोकायत चे नीरज जैन उपस्थित होते तर सभेचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते हाजी भाई नदाफ होते तर सभेचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले सभेस नागरिकांचा, महिलांचा व तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद होता सभेस संबोधित करताना विद्यार्थी नेता फहाद अहमद व अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या भाषणाने तर उपस्थितांनी उस्फूर्त दाद दिली व जोशपूर्ण वातावरण निर्माण केले व भाषणात विविध मुद्दे पटवून दिले या सभेला उपस्थिती म्हणून मा.महापौर रजनी त्रिभुवन, नगरसेवक प्रदीप गायकवाड, नगरसेविका लताताई राजगुरू, प्रकाश साळवे,मयुर गायकवाड, मेहबूब नदाफ,शाम गायकवाड,सुमनताई गायकवाड,सचिन शिंदे, महेंद्र कांबळे,किशोर वाघिला, मीरा शिंदे,जनार्दन जगताप,अंनथोनी वाकडे, शाम गायकवाड 2,दयानंद तानावडे,  आदी मान्यवर उपस्थित होते